अंकाचे स्वरूप / सुरुवात

अक्षरगाथा नियतकालिकाची सुरुवात सृजन या शीर्षकाने सप्टे-ऑक्टो-नोव्हें-डिसें या अंकाने 17 सप्टेबर 2009 या मराठवाडा मुक्तीदिनापासून झाली. सुरुवातीचे दोन अंक ‌‘सृजन’ या नावाने निघाले.

10 एप्रिल 2010 ला ‌‘अक्षरगाथा’ या शीर्षकाचा पहिला अंक (एप्रिल-मे-जून) प्रसिद्ध झाला. मानवी जीवनाचा प्रवास कला, साहित्य, संस्कृतीच्या अंगाने होतो. ही वाटचाल लोकशाहीतील जीवनमूल्य-स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या जीवनमूल्यांवर होऊन या मूल्यांवर आधारलेली नवी संस्कृती निर्माण व्हावी अशी अक्षरगाथा नियतकालिकाची भूमिका असल्यामुळे ‌‘साहित्य, कला, संशोधन व परिवर्तनवादी पुरोगामी विचाराशी बांधिलकी’ हे ब्रीद घेऊन अंकाची वाटचाल चालू आहे. 

विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी तत्त्व, विचार, मूल्य, नैतिकता यांची जशी गरज आहे तशीच सृजनात्मक निर्मितीचीही गरज आहे. सृजनशील निर्मितीला प्रसिद्धी व त्याचे स्वागत करतानाच विचारमंथन, चर्चा, चिंतन, संवाद यालाही प्रसिद्धी देण्याचा अंकाचा प्रयत्न आहे. ज्यातून समाजाच्या दृष्टीने विधायक व रचनात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यातून पुरोगामी विचाराच्या चळवळीला बळ मिळावे असाही हेतू आहे.

भूमिका, हेतू/उद्दिष्ट्ये

* विधायक व रचनात्मक कार्य करणाऱ्या चळवळी जीवंत राहाव्यात, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संविधान मूल्याचा आग्रह धरणारे, तशी संस्कृती निर्माण करू पाहणारे साहित्य प्रसिद्ध करणे. 
* समाजाला दिशादर्शक असे ललित व वैचारिक साहित्य सातत्याने प्रकाशित करणे त्यावरील संवाद, चर्चा घडवून आणणे व त्याला प्रसिद्धी देणे. 
* संस्कृती, सांस्कृतिक माध्यमे यांची वर्तमान परिस्थितीत निट समीक्षा व चिकित्सा होईल अशा प्रकारच्या वैचारिकतेला प्रोत्साहन देणारे लेखन प्रसिद्ध करणे. 
* साहित्य, कला, संशोधन, तत्त्वज्ञान, ज्ञान-विज्ञान, शिक्षण यावरील लेखन, संशोधन, समीक्षा, चर्चा यांना प्रसिद्धी देणे. 
* प्रबोधनात्मक लेखनाबरोबरच रंजनात्मक लेखनाला प्रसिद्धी देणे. 
* शिक्षण, अर्थकारण, राजकारण, पुरोगामी चळवळी यांचा समाजोन्नतीसाठी सकारात्मक मागोवा घेणे. 
* वर्तमान समाजातील घटना घडामोडीचा कारण परिणामासह चिंतनात्मक आढावा घेऊन त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम शोधणाऱ्या लेखनाला प्रसिद्धी देणे.

अंकातून प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराचे स्वरूप (लेखनाचे विषय)

* भाषा, व्याकरण, अनुवाद, भाषांतर इत्यादी. 
* ललित वाङ्मय  
* समीक्षा व साहित्य संशोधन  
* कलाविचार व कला संशोधन, कला, नृत्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प 
* तत्त्वज्ञान 
* सामाजिक प्रश्नांची मीमांसा 

पेपर कसा पाठवावा

अक्षरगाथा दर्जेदार ललित व वैचारिक लेखनाचे नेहमीच स्वागत करीत आला आहे. अक्षरगाथाकडे आपले लेखन पाठवण्यापूर्वी पुढील काळजी घ्यावी. 
1) आपले लेखन सुवाच्च अक्षरात कागदाच्या एकाच बाजूस असावे. 
2) आपले लेखन इ-मेल द्वारे पाठवताना…
अ)आपले लेखन सुवाच्च अक्षरात कागदाच्या एकाच बाजूस असावे. शक्यतोवर टाईपसेटिंग (डी.टी.पी.) करून सी.डी. किंवा ई-मेल पत्त्यावर साहित्य पाठवावे.
ब)आपला लेख यापूर्वी कुठल्याही नियतकालिकाला प्रसिद्धीसाठी पाठवलेला नसावा.
क)‌‘अक्षरगाथा’ हे नियतकालिक निरनिराळ्या वाङ्मयप्रवाहांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे एकाच प्रवाहावर / विषयाव अनेक लेख प्राप्त झाल्यास त्यापैकी एखाद्या लेखाचा अंकात समावेश करून इतर दर्जेदार लेखाचा पुढील अंकासाठी विचार केला जातो. 
ड)शक्य झाल्यास आपल्या लेखनाची सीडी किंवा ई-मेल पाठविल्यास आम्हास मदत होईल. त्यासाठी वापरले जाणारे मराठीचे सॉफ्टवेअर म्हणजे (Shri Lipi 708 font in Pagemaker or MS-Word)
इ)कविता, कथा, कादंबरीचा संपादित अंश, ललित गद्य, नाट्यछटा, एकांकिका अशा स्वरुपाच्या लेखनासाठी निवड समिती ज्या लेखनाची शिफारस करते असेच लेखन प्रसिद्ध केल्या जाते.  ही बाब कृपया लेखक, कवी, निर्मात्यानी लक्षात घेऊन आपले साहित्य प्रकाशित करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊ नये अशी नम्र विनंती. 
3) आपण लेखनासाठी जे संदर्भ वापरले असतील ते लेखाच्या शेवटी काही टीपा असल्यास त्यासह द्यावेत. 
4) आपण आपला लेख यापूर्वी कुठल्याही नियतकालिकात प्रसिद्धीसाठी पाठवलेला नाही किंवा यापूर्वी तो अन्य नियतकालिकात प्रसिद्ध झाला नाही याची स्पष्ट कल्पना अक्षरगाथाच्या संपादकाना द्यावी. 
5) अक्षरगाथामध्ये लेख छापण्यापूर्वी त्या त्या विषयातील अभ्यासकाकडे/संपादक मंडळ सदस्याकडे अभिप्रायासाठी पाठवला जातो.
6) अक्षरगाथात संशोधनमूल्य व संदर्भमूल्य असलेल्या साहित्यालाच प्रसिद्धी दिली जाते केवळ माहितीवजा मजकूर स्वीकारला जात नाही. 
7) अक्षरगाथा नवोदितांच्या दर्जेदार लेखनाचे नेहमीच स्वागत करते. 
8) लेखकाने आपल्या लेखनाची प्रत स्वतःजवळ ठेवावी. नापसंत लेखन परत पाठवणे शक्य नाही. 
9) लेखन अनुवादित वा रूपांतरीत असल्यास मुळ लेखकाची व प्रकाशकाची संमती लेखी स्वरूपात जोडावी. 

वाचक / वर्गणीदार यांना आवाहन

‌‘अक्षरगाथा’ त्रैमासिक दर्जेदार साहित्याला प्रसिद्धी देण्याच्या हेतूने निष्ठापूर्वक कार्य करणार आहे.  नियतकालिकाला सातत्य टिकवण्यासाठी लेखनाची जशी गरज असते तशी वाचकाचीही गरज असते.  साहित्य-कला-संशोधन व पुरोगामी विचार मानवी जीवनासाठी विशेषतः वर्तमानकालीन जीवनासाठी तर अगत्याचे आहेत.  या सर्वांचे संवर्धन करणे हे विचारशील व विवेकी माणसाचे कर्तव्य आहे.  विचार व साहित्यकला यांच्या सृजन व संवर्धनासाठी आपल्यासारख्या वाचकांची/वर्गणीदारांची गरज आहे. आपण आपल्या पद्धतीने ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आम्ही आपणास नम्र आवाहन करत आहोत.

प्रकाशकासाठी 

1) मराठीत नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके लेखक/प्रकाशकांनी अक्षरगाथाकडे अवश्य पाठवावी. 
2) परीक्षणासाठी पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात. 
3) परीक्षणासाठी आलेली पुस्तके, परत पाठवली जात नाहीत. 
4) परीक्षणासाठी आलेल्या पुस्तकांना साभार पोच अक्षरगाथातून देण्यात येते. 
5) सर्वच पुस्तकांची परीक्षणे देणे शक्य नसले तरी महत्त्वाच्या पुस्तकाची दखल अथवा अभ्यासकांनी त्या पुस्तकावर लिहिलेले परीक्षण प्रसिद्ध केले जाईल. 
6) ललित लेखन, समीक्षा, संशोधन, वैचारिक लेखन, अनुवाद विशेषतः कला, साहित्य, संस्कृती व पुरोगामी विचारावरील लेखनावरील परीक्षणे/भाष्य प्रसिद्ध केले जाईल. 

Scroll to Top