साहित्य, कला, संशोधन व परिवर्तनवादी पुरोगामी विचाराशी बांधिलकी ठेवणारे त्रैमासिक

‌‘अक्षरगाथा‌’ त्रैमासिक आक्टो. 2009 पासून नियमित प्रकाशित होत आहे. तज्ज्ञ परीक्षण समिती व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधन नियतकालिक यादीत समाविष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, इतिहास, कला, संस्कृतीसह अर्थ, राजकीय, सामाजिक, विषयांवरील लेखन प्रसिद्ध करण्यात येते. महत्त्वपूर्ण साहित्यिक, विचारवंत, संशोधक, नव्या पिढीचे अभ्यासक, पुरोगामी चळवळीतील समाजधुरीण व कार्यकर्ते यांचे विचारशील, चतनात्मक व सर्जनात्मक लेखन प्रकाशित करण्याचा प्रयत्न असतो. वैचारिकविश्व आणि भावविश्व अधिक समृद्ध करण्याच्या हेतूने हदी आणि इंग्रजी भाषेतील गुणवत्ताप्राप्त लेखनाला अनुवादरूपात प्रकाशित करण्यावर भर दिला जातो.

वर्तमान समाजात निर्माण होणारे पेच आणि प्रश्न यांचा धांडोळा घेत 1) मराठी कादंबरी 2) डॉ.आ.ह.साळुंखे 3) मराठी भाषा 4) मराठी साहित्यविचार 5) मराठी भाषाभ्यासक्रम 6) कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय 7) परिवर्तनाच्या चळवळी 8) सांस्कृतिक दहशतवाद विरोधी विवेकी विचार 9) जात व पितृसत्ता 10) लोकशाहीपुढील आव्हाने व भारतीय समाज 11) जागतिकीकरण भारतीय शेती आणि जातिव्यवस्था 12) वर्तमान समाज आणि माध्यमे इ. विशेषांक प्रसिद्ध केले आहेत.

एकूणच विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांपासून सर्वसामान्य वाचकांना डोळ्यासमोर ठेवून वैचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रकारचे लेखन प्रसिद्ध केले जाते.

आपले महाविद्यालय / संस्था / ग्रंथालय अक्षरगाथा चे वर्गणीदार व्हावे, अशी इच्छा आहे. आपल्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वाचन संस्कृती वृद्धगत करण्यात सहकार्य लाभेल.
व्यक्ती कवा संस्था कुणालाही व कोणत्याही महिन्यापासून वर्गणीदार होता येते. अंक प्रकाशित झाल्यानंतर वर्गणीदारांना मिळावा, याकडे लक्ष देण्यात येते. वर्गणीदारांच्या अभिप्राय आणि सूचनांसाठी अक्षरगाथा नेहमीच स्वागतशील राहिले आहे. आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक यांना अंकाविषयी माहिती देऊन व्यक्तिगत वर्गणीदार होऊ इच्छिणाऱ्यांनाही माहिती द्यावी, ही विनंती !

धन्यवाद !

अक्षरगाथाचे संग्राह्य विशेषांक

Scroll to Top