अक्षरगाथा नियतकालिकाची सुरुवात सृजन या शीर्षकाने सप्टे-ऑक्टो-नोव्हें-डिसें या अंकाने 17 सप्टेबर 2009 या मराठवाडा मुक्तीदिनापासून झाली. सुरुवातीचे दोन अंक ‘सृजन' या नावाने निघाले.
10 एप्रिल 2010 ला ‘अक्षरगाथा' या शीर्षकाचा पहिला अंक (एप्रिल-मे-जून) प्रसिद्ध झाला. मानवी जीवनाचा प्रवास कला, साहित्य, संस्कृतीच्या अंगाने होतो. ही वाटचाल लोकशाहीतील जीवनमूल्य-स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या जीवनमूल्यांवर होऊन या मूल्यांवर आधारलेली नवी संस्कृती निर्माण व्हावी अशी अक्षरगाथा नियतकालिकाची भूमिका असल्यामुळे ‘साहित्य, कला, संशोधन व परिवर्तनवादी पुरोगामी विचाराशी बांधिलकी' हे ब्रीद घेऊन अंकाची वाटचाल चालू आहे.
विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी तत्त्व, विचार, मूल्य, नैतिकता यांची जशी गरज आहे तशीच सृजनात्मक निर्मितीचीही गरज आहे. सृजनशील निर्मितीला प्रसिद्धी व त्याचे स्वागत करतानाच विचारमंथन, चर्चा, चिंतन, संवाद यालाही प्रसिद्धी देण्याचा अंकाचा प्रयत्न आहे. ज्यातून समाजाच्या दृष्टीने विधायक व रचनात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यातून पुरोगामी विचाराच्या चळवळीला बळ मिळावे असाही हेतू आहे.
वार्षिक वर्गणी
व्यक्ती : रु.400/- संस्था : रु.500/-
त्रैवार्षिक वर्गणी
व्यक्ती : रु. 1000/- संस्था : 1200/-
10 वर्षासाठी
व्यक्ती : रु. 3000/- संस्था : 4000/-
मनीऑर्डर / रोखीने / धनादेश / धनाकर्ष /
Phone Pay / Google Pay on 9422874336 /
बँक खाते _ भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
यशवंतनगर, नांदेड,
अक्षरगाथा खाते क्र. 32204333102
IFSC Code : SBIN0001922
संपादक : मा. मा. जाधव
‘बळीवंश’, नृसह पॅलेसच्या मागे, नरहरनगर,
नांदेड - 431 605.
भ्र. 9422874336, 9881191543.
e-mail : akshargatha@gmail.com
website : www.akshargatha.com
'Baliwansh', Behind Nrusinh Palace, Narharnagar, Nanded - 431605.
Copyright © 2024 Akshargatha - All Rights Reserved.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.